पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गावकारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

इमेज
नंदुरबार जिल्ह्य़ातील दोन महिला सरपंच गावकारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण 'पंचायत से पार्लमेंट' कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती दौपदी मुर्मु करणार मार्गदर्शन  नंदुरबार, (प्रतिनिधी) राष्ट्रीय महिला आयोगांतर्गत दि.6 जानेवारी 2025 रोजी "पंचायत से पार्लर्मेंट" या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले असून महाराष्ट्र राज्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास प्रबोधिनी,यशदा,पुणे यांचे कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार जि.प.नंदूरबार ग्रामपंचायत विभातून नंदूरबार जिल्ह्यात अनु.जमाती तील ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच यातून आदर्शगाव पुरस्कार प्राप्त सौ. मनिषा विलास पाडवी, ग्रा. पं, सिसा ता. धडगाव जि.नंदूरबार व ग्रामपंचायत कारभारात सुसुत्रचा व नियोजनबध्द कामकाजा नोंद प्रभावी ग्रामप्रशासन चालवि-या सौ. अनिता आनंद नाईक, ग्रा. पं. नगारे, ता. नवापूर जि. नंदूरबार या दोन महिला सरपंच यांची निवड केली असूनयाकरीता यशदा,पुणे चे श्री.सुधांशु सर, महासंचालकसो. डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी ,उपमहासंचालक सो. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  राज्यभरातून ...

अलविदा 2024 Vijay Patil

इमेज
  अलविदा 2024     म्ह णता म्हणता चोरपावलांनी २०२४ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.   व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, " आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते.." शेवटी भुतकाळ म्हणजे  काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही हा देखील मिळतो. एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.    नवीन वर...

नवी मुंबईत १९ जानेवारी रोजी रंगणार दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन

इमेज
  नवी मुंबईत १९ जानेवारी रोजी रंगणार  दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन       नंदुरबार , दि. २२  गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी  ९ ते ६ यावळेत विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर -१६ A, वाशी बस डेपो समोर, जुहू - वाशी रोड, वाशी, नवी मुंबई येथे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे.        या संमेलनात संपूर्ण भारतातील गझलकारा सहभागी होऊ शकतात. आजीवन सभासदांना प्रथम प्राधान्य असणार आहे. नावनोंदणी व सहभाग निःशुल्क असेल. नावनोंदणीची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५ अशी आहे. नाव नोंदणीसाठी मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. प्रणाली म्हात्रे (मो. 8779879446) आणि मुंबई जिल्हा सचिव सौ. सोनाली जगताप (मो.  88502 39310) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव व मुंबई जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण Balaji Sutar

इमेज
 ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण नमस्कार!       अं बाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून काही बोलण्याची संधी मिळते आहे, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या इथल्या शाखेचे अध्यक्ष श्री दगडू लोमटे, मसापचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य, मसापच्या कामात आणि एकंदरीतच अंबाजोगाईच्या सार्वजनिक जीवनात सदैव पथदर्शी असलेले श्री अमर हबीब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री सुदर्शन रापतवार, स्वागत-समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, आणि इतरही सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो.      माझ्या आधीचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य यांचे मला स्वतंत्रपणे आभार व्यक्त करावे लागतील, याचं कारण, इथे अंबाजोगाईत आल्यावर ज्यांच्याकडे बघून आपणही काही लिहून पाहावं अशी मनात इच्छा उमटायला लागली, त्यातलं एक मोठं नाव ‘दासू वैद्य’ हेच होतं. मला याक्षणी प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रा. शैला लोहिया यांचीही आठवण येते आहे. या सगळ्यांच्या ‘अक्षरांचं’ माझ्यावर अतोनात ऋण आहे.      याआधी अतिशय महनीय आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी अंबाजोगाई साहित्य संमेलन...

गंगा जामुना दोन्ही खेते! Shivaji Salunke

इमेज
 गंगा जामुना दोन्ही खेते!       श ब्दमाळ सजवणा-या, त्यात अनेक साहित्यरत्नांनी विविध साहित्याचे सुंदर सुंदर मणी ओवून  तिची शोभा शतगुणित करणाऱ्या शब्दप्रभूंना मानाचा मुजरा!      मागील महिन्यात तुळशीविवाह संपन्न होताच लग्नकार्याला प्रारंभ झालेला आहे. अलिकडे महाराष्ट्रानेही ईतर राज्यात असलेल्या प्रघाताप्रमाणे लग्नसोहळ्यचे एक नवीनच रूप, स्वरुप व प्रारूप स्वीकारलेले बघायला मिळते. पूर्वी लग्नाचा मुहुर्त ठरल्यावर एकाच दिवशी साखरपुडा, हळद, मेहंदीचा कार्यक्रम व्हायचा पण ती पद्धत आता जवळजवळ बादच झालेली दिसते. नामशेष होत चाललेली दिसतेय, आता मेहंदी, हळद आणि तिसऱ्या दिवशी विवाह अशी एक नवीनच प्रथा सुरू झालेली आहे. ज्यला आपण ईव्हेंट साजरी करणे वगैरे म्हणतो तोच हा प्रकार आहे. मी आतापर्यंत नागपूर, कल्याण, अमळनेर येथील तांदळी व चाळीसगाव येथील दोन असे एकूण पाच विवाह सोहळे अगदी जवळून बघितलेत, अगदी जवळून न्याहळलेत. त्यातील तांदळी येथील लग्न बारा वाजून काही मिनिटांचे होते व तेथे आम्ही सकाळी आठ साडेआठच्या सुमारास पोचलो तेंव्हा कडाक्याच्या थंडीचा खूप प्रादुर्भाव जाणवल्याम...