बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा
बालगायिका स्पृहा सागर पाटीलच्या आवाजात हनुमान चालीसा; नऊ दिवसांत ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज ज्येष्ठ गझलकार प्रा. सुनंदा पाटील (गझलनंदा) यांची नात स्पृहा सागर पाटील (वय ११) हिने आपल्या गोड आवाजात सादर केलेल्या श्री हनुमान चालीसाच्या व्यावसायिक रेकॉर्डिंगला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टाइम्स म्युझिक व्हिडिओने हे रेकॉर्डिंग केले असून, अवघ्या नऊ दिवसांत या व्हिडिओला ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. स्पृहाच्या गायनातील मधुर आवाज, ताल-सुरांची उत्तम समज, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे श्री हनुमान चालीसाचे गायन अत्यंत श्रवणीय झाले आहे. तिच्या या सादरीकरणाचे संगीतप्रेमी आणि रसिकांकडून कौतुक होत आहे. स्पृहा सध्या इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ. सुहासिनी नांदगावकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. सौ. सुहासिनी नांदगावकर या सुप्रसिद्ध गीतकार व कवीवर्य शांताराम नांदगावकर यांच्या सुनबाई आहेत. स्पृहाने आतापर्यंत शास्त्रीय कंठसंगीताच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. गायन क्षेत्रात स्पृहाने अनेक स्पर्धांमध...