पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni

इमेज
          ● गझल प्रभात ●    🌹  वाढदिवस विशेष 🌹  🌷 हाता मधला डाव हारता  येतो 🌷 शब्द जोडुनी अर्थ बदलता येतो  शब्द खोडुनी अनर्थ करता येतो भातुकलीचा खेळ खेळला की मग  संसाराचा डाव जिंकता येतो. पैशामागे धावत सुटल्यावरती स्वाभिमानही सहजच विकता येतो समोरचा जिंकावा म्हणून हल्ली हाता मधला डाव हारता  येतो आयुष्याने हतबल केल्या नंतर   झालेला अपमान हि गिळता येतो रेखा कुलकर्णी  गझलकारा रेखाजी कुलकर्णी  यांना  वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹 =•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= संयोजक:- भरत माळी मो. 9420168806 =•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

इमेज
 ● गझल प्रभात ●    🌹 वाढदिवस विशेष 🌹  🌷डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला🌷 किमयेमुळे तुझ्या ही, नवपालवी मनाला कुठला सुगंध माझ्या हृदयी खुलून आला बेचैन या मनाला दे सावली जराशी सोसायचे किती मी विरहातल्या उन्हाला कैफात भावनांनी बरसून आज जावे डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला व्याकूळ जीव माझा झुरतो तुझ्याचसाठी भेटीस ये अता अन् दे अर्थ जीवनाला मी शांतवू कशाने अस्वस्थ या मनाला व्यसन तुझे कशाला तू लावलेस त्याला? अनिल कांबळे   गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष  गझलकार अनिल कांबळे  यांना  वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹 =•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= संयोजक:- भरत माळी मो. 9420168806 =•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=