हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni

         ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹




 🌷हाता मधला डाव हारता  येतो🌷


शब्द जोडुनी अर्थ बदलता येतो 

शब्द खोडुनी अनर्थ करता येतो


भातुकलीचा खेळ खेळला की मग 

संसाराचा डाव जिंकता येतो.


पैशामागे धावत सुटल्यावरती

स्वाभिमानही सहजच विकता येतो


समोरचा जिंकावा म्हणून हल्ली

हाता मधला डाव हारता  येतो


आयुष्याने हतबल केल्या नंतर  

झालेला अपमान हि गिळता येतो


रेखा कुलकर्णी


 गझलकारा रेखाजी कुलकर्णी यांना 

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

टिप्पण्या

  1. छान जमली आहे गझल ....
    आवडली ....
    वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ....
    🌹🎂💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale