पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वासलात (कादंबरी) Latika Chaudhari

इमेज
 वासलात (कादंबरी)       ज्येष्ठ लेखिका खानदेश कन्या लतिका चौधरी यांचे अकरावे पुस्तक वासलात (मराठी कादंबरी) लवकरच आपल्या भेटीला येते आहे. सदरहू कादंबरीस जेष्ठ साहित्यिक एकनाथ पगार यांची पाठराखण लाभली असून मा. प्रा. फुला बागुल यांची प्रस्तावना व प्रा. रमेश माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. _______________________________ मानवी मनातील लोभ, मद, मोह, मत्सर, कामभावाचे आकर्षण आणि उथळ सुखसंपन्नतेच्या ध्यासात एक सुडकथा अधिकाअधिक गुंता निर्माण करीत जाते. प्रेम, क्षणिक सुखभाव वरवर उन्मळत राहतात.  विवाहिता, एकल स्त्री, परित्यक्ता, विधवा, नवथर तरुणी, माता, सखी अशा स्त्री रूपाच्या विविध परी, त्यांचे पुरुषांशी असलेले नैतिक, अनैतिक आणि न-नैतिक संबंधाचे परिणामकारक चित्रण वाचकाच्या मनास, बुद्धीस कोरत जाते, टुचत जाते. वाचक अलगद आपल्या, सभोवतालच्या गतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो.  स्वयंप्रज्ञ धाडसाने विवेकी, मुक्त आयुष्य घडवू पाहणारे स्त्रीरूप वेगळे पडत असले तरी वाचकासमोर, समाजामोर एक आदर्श रूप म्हणून उभे राहते. स्त्री ही व्यक्तिगत मालमत्ता समजून छळणारे, सूड...

स्वागताध्यक्ष दगडूदादा लोमटे यांचे स्वागताध्यक्षीय भाषण

इमेज
दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन, अंबाजोगाई  स्वागताध्यक्ष दगडूदादा लोमटे यांचे स्वागताध्यक्षीय भाषण सा धना सेवाभावी संस्था आयोजित दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनना निमित्त सुरेश भट गझल नगरीत, भाऊसाहेब पाटणकर स्मृती प्रवेशद्वार व सतीश दराडे स्मृती मंचावरून आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.     या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे, उद्घाटक डॉ. संदीप गुप्ते, अमळनेर येथे पार पडलेल्या पहिल्या अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष  डॉ. सुरेश खुरसाले, रसिकाग्रणी नाना लोढम, दत्ता बाळसराफ, प्रशांत वैद्य, आमदार नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपस्थित विविध गझल मुशायऱ्यांचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, सहभागी गझलकार,   मंचासमोर बसलेले सर्व रसिक आणि बंधुभगिनीनो, उपस्थित सर्व मान्यवर, स्वागत समितीचे ईतर सर्व पदाधिकारी व सदस्य,  उपस्थित पत्रकार बांधव यांचे  मी दगडू  लोमटे, स्वागताध्यक्...

दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन, संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे अध्यक्षीय भाषण

इमेज
 दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई  संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे अध्यक्षीय भाषण नमस्कार ! या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून आपणा सर्वांना संबोधित करताना मला खूप आनंद वाटतो आहे. कारण मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या 'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या, मराठी कवितेची, मराठी भाषेची व वाङ्मयाची जन्मभूमी असलेल्या मुकुंदराज, दासोपंत आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या या अद्भुत अंबाजोगाई नगरीत गझलकरांचा हा उत्स्फूर्त 'एल्गार' आपण सर्वजण पाहतो व अनुभवतो आहोत. गजलच्या आजवरच्या अनेक संमेलनांमधून अनेक गजलकारांना गजल लिहिण्यासाठी प्रोत्साहन व ऊर्जा मिळत आलेली आहे व मी स्वतः याचा साक्षीदार आहे. संमेलनांमधील मुशायरे, परिसंवाद, मुक्त चर्चा, गजल गायनाच्या मैफली ही रसिकांसाठी केवळ एक पर्वणी नसून त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात नव्या गजलकारांना व गायकांना ऐकण्याची तसेच परिसंवाद, चर्चा-सत्रांमधून गजलेबद्दलच्या आपल्या जाणिवा रुंदावण्याची संधी गजलकार व रसिकांना या संमेलनांमधून मिळत असते.  याप्रसंगी क...