आठव्या वेतन आयोगाला २०२९ चा मुहूर्त उजाडणार
आठव्या वेतन आयोगाला २०२९ चा मुहूर्त उजाडणार नंदुरबार (प्रतिनिधी) केंद्र सरकारने घेतलेला आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना २०२६ साठी पगारवाढ देणारा असून या निर्णयाचे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाने स्वागत केले आहे. आजवरचा इतिहास पाहता आठवा वेतन आयोग महाराष्ट्रातील राज्य शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू होण्यास २०२९ हे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. असे प्रतिपादन राज्य सरकारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी केले आहे. यासंदर्भात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये केंद्र सरकारने लागू केलेला सातवा वेतन आयोग राज्य लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने २०१९ या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वर्षात काढला होता. आता आठवा वेतन आयोगही २०२९ या निवडणूक वर्षात लागू होण्याची शक्यता प्रशासनातील जाणकारांनी वर्तवली आहे. वेतन आयोगाच्या वेळीच आम्ही फिटमेंटसाठी २.८६ हे प्रमाण वापरण्याची आग्रही भूमिका घेतली होती. ती यावेळी तरी स्वीकारावी. केंद...