लीना हिरणवाळेची आरोग्य सेविकापदी निवड
लीना हिरणवाळेची आरोग्य सेविकापदी निवड
नंदुरबार (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात येथील लीना महादू हिरणवाळे यांची आरोग्य सेविका म्हणून निवड झाली आहे.
गवळी समाजाच्या एनटी ब प्रवर्गातून लीना हिरणवाळेची नियुक्ती असून बागलाण तालुक्यातील वाघंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणार आहे. नंदुरबार येथील सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री आणि पत्रकार महादू हिरणवाळे व सौ. सुनिता हिरणवाळे दाम्पत्याची लीना कन्या आहे. शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल लीना हिरणवाळे हिचे गवळी समाजासह सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा