डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला🌷


किमयेमुळे तुझ्या ही, नवपालवी मनाला

कुठला सुगंध माझ्या हृदयी खुलून आला


बेचैन या मनाला दे सावली जराशी

सोसायचे किती मी विरहातल्या उन्हाला


कैफात भावनांनी बरसून आज जावे

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला


व्याकूळ जीव माझा झुरतो तुझ्याचसाठी

भेटीस ये अता अन् दे अर्थ जीवनाला


मी शांतवू कशाने अस्वस्थ या मनाला

व्यसन तुझे कशाला तू लावलेस त्याला?


अनिल कांबळे



 गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष

 गझलकार अनिल कांबळे यांना 

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

टिप्पण्या

  1. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा

    उत्तर द्याहटवा
  2. ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व सन्माननीय गझलकारांनी आपली गझल व फोटो मला खालील नंबर वर पाठवा
    भरत माळी 9420168806

    उत्तर द्याहटवा
  3. छान गझल ....
    आवडली ....
    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ....

    दिवाकर चौकेकर, गांधीनगर
    🙏🌹🎂💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni