रुद्राभिषेक कार्यक्रमाला उसळला भाविकांचा जनसागर

 शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर आयोजित रुद्राभिषेक कार्यक्रमाला उसळला भाविकांचा जनसागर



सुरत, (मनोहर महाजन) 

    सुरत येथे होत असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर आयोजित रुद्राभिषेक कार्यक्रमाला भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. या कार्यक्रमाविषयी भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

     सुरत येथील सुप्रसिद्ध साईलीला ग्रुपचे संचालक सुनील पाटील आणि सम्राट पाटील यांच्यातर्फे दि. १६ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डिंडोली खरवासा गावानजीक होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी महारुद्राभिषेक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला देखील भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या कार्यक्रमाविषयी भाविकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.


१२ जानेवारीला भव्य कलश यात्रा


या कार्यक्रमानिमित्त १२ जानेवारी रोजी भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या कलश यात्रेचा प्रारंभ डिंडोली मिलेनियम पार्क पासून होणार आहे. तर समारोप कार्यक्रम स्थळावर होईल. या शोभायात्रेत महिला भाविकांनी लाल साडी आणि पुरुष भाविकांनी लाल कुर्ता असा पारंपरिक वेश परिधान करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni