संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी स्काऊट गाईड चळवळ महत्वा

 संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी स्काऊट गाईड चळवळ महत्वाची- प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी



समता विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न

     नंदुरबार (प्रतिनिधी) संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी स्काऊट गाईड चळवळ महत्वाची आहे, असे प्रतिपादन प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी केले. धानोरा येथे आयोजित स्काऊट गाईड शिबिरात ते बोलत होते.

     नंदुरबार तालुका विधायक समितीचे समता विद्यालय व प्रियदर्शनी कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड पथकांचे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत स्काउट गाइड नंदुरबार जिल्हा मुख्यालय आयुक्त पुष्पेद्र रघुवंशी व प्रमुख पाहुणे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती , विद्यमान संचालक विक्रमसिंह वळवी , विद्यालयाचे प्राचार्य चंद्रशखेर लोखंडे, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश महाजन, पर्यवेक्षक रविकांत वसावे तसेच धानोरा गावातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

     या एकदिवसीय निसर्गरम्य शिबिरात ध्वजारोहण, तंबू सजावट, बिन भांड्याचा स्वयंपाक, मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन विद्यालयातील गाईड शिक्षिका श्रीमती इंदिरा पवार, ईलावती वसावे, मिरा कोकणी व स्काऊट शिक्षक श्री शांताराम मराठे, श्री प्रेमचंद पाटील श्री अरुण सैंदाणे व विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. स्काऊट शिबीरातील इ. ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांचे तंबू सजावटचे निरीक्षण व स्वयंपाकाचे चवीचे परिक्षण विद्यालयातील जीवन पाटील व जे. आर. रघुवंशी यांनी केले.

     या वेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी यांनी स्काऊट गाईड विषयाचे महत्त्व व व्यक्तिमत्व विकासासाठी स्काऊट गाईड चळवळीचे योगदान याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

     सदर कार्यक्रमांचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री चंद्रशेखर लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती नम्रता कासार व श्री किरण बेडसे यांनी केले. तर आभार स्काउट शिक्षक प्रेमचंद पाटील यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षिका, युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni