तुकारामदादा ढिकले Vijay Patil
वाढदिवस विशेष
🌹तुकारामदादा ढिकले🌹
माझिया रक्तात अजुनी त्या तुक्याचा अंश आहे..
ऐतखाऊ भामट्यांची ही खुळी पैदास नाही!
अस लिहिणारा माणूस कसा असेल बर तरुणांना लाजवेल असा उत्साह सळसळतो या माणसात उत्कृष्ट कविता गजल लेखन साहित्यात मुशाफिरी करून शेती मातीत रमणारा सौ. सोबत भटकंती करणारा हा अवलिया माणूस म्हणजे आमचे नाशिक चे जिव्हाळ्याचे मित्र आदरणीय तुकाराम दादा ढिकले
माणस जन्माला येतात प्रपंच करतात अन या जगातून निघून जातात पण या प्रपंचा बरोबर च आपण समाजाच काही देण लागतो या भावनेने जगतात त्याच माणसांची हे जग दखल घेते आदरणीय कै.कमलाकर आबा नी यांचा परिचय मला फोनवर करून दिला होता एक दिवस काही कामानिमित्त नासिक ला होतो अन मुक्कामाची सोय नव्हती दादांचा नंबर होताच फोन केला मी मुक्कामाला येऊ का त्यांनी एक मिनिटात आनंदाने परवानगी दिली सौ. ढिकले ताई नी उत्तम स्वयंपाक केला होता आग्रहाने खाऊ घातलेल जेवण अन येथेच्छ गप्पा मला वाटलंच नाही मी पहिल्यांदा भेटतो आहे घरी दोघेच असतात नियतीने त्यांचा एक कर्तबगार मुलगा हिरावून नेला पण दादा त्या दुःखातून ही स्वतः सावरले कुटुंबाला ही सावरल शेती मातीत अन साहित्यात रमणारा माणूसच सावरू शकतो कारण शेती माती व साहित्य जगण्याच बळ देत दादांनी अनेक नामांकित गीतांवर त्याच्या स्वतःच्या विडंबन कविता लिहिल्या आहेत.
अनेक साहित्य संमेलन अनेक गजल संमेलनात दादांना आदराने बोलावलं जात हसतमुख स्वभाव अन कमालीची नम्रता या मुळे साखर जशी पाण्यात विरघळून जाते तसा या माणसाविषयीं चा आपल्या मनातील आदर दुपटीने वाढुन जातो.या वयातही ते योगा करतात नियमित फिरायला जातात ड्रायव्हिंग करतात त्या मुळे त्यांचं आरोग्य उत्तम आहे अन त्यांची तेवढीच काळजी आमच्या माय माऊली ढिकले वहिनी घेतात
उम्र थका नहीं सकती
ठोकरे गिरा नहीं सकती
अगर जितने की जिद हो तो
परिस्थितीया भी हरा नहीं सकती
दोघे एकमेकांना पूरक आहेत कधीतरी वाटलं तर मुंबईला डॉक्टर मुलाकडे जाऊन येतात शेतीत फेरफटका मारून येतात आयुष्याचा खरा आनंद दादा लुटता आहेत
जब हर हाल मे है जीना
तो फिर काहे को रोना
आज दादांचा वाढदिवस आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो या सदिच्छा
दादासाठी मी एवढंच म्हणेन
दर्द मिले है काफी मगर हमने मुस्कुराना नही छोडा
ख्वाब तुटे है कही फिर भी हमने जिंदगीसे मुह नही मोडा
रास्ते मुश्किलोसे भरे है फिर भी हमने चलना नही छोडा
जिंदगीकी इन सारी मायुसी और उतार चढाव मे
हमने अपनी उम्मीदो से नाता नही तोडा
विजय पाटील


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा