माझ्या चार रचना Shivaji Appa Salunke
● नूतन वर्ष विशेष ●
🌹 माझ्या चार रचना 🌹
माझ्या समस्त लेखक कवी व गझलकार बंधू भगिनींनों तसेच मला सदोदित प्रोत्साहन देऊन लिहिते ठेवण्याची प्रेरणा देणाऱ्या रसिक सन्मित्रांनो नमस्कार🙏
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
मी आज पाठवीत असलेल्या चार रचनांपैकी दोन रचना मराठीत, एक रचना अहिरानीत व एक रचना हिंदी भाषेतील आहे.
नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या नवीन उपक्रमाने करावी म्हणून मी या चारही रचना "वियदगंगा" या एकाच वृत्तात वृत्तबद्ध केलेल्या आहेत.
मराठी आणि हिंदीत लिहायचा सराव असल्यामुळे मला फारशी अडचण जाणवली नाही, परंतु अहिरानीत लिहीत असताना अजयदादा बिरारी,आप्पासाहेब विश्राम बिरारी सर, धुळे, बापूसाहेब भामरे शिरपूर, ज्ञानेश्वरदादा भामरे वाघाडी, हडपसरचे नानाभाऊ माळी, उद्धवराव महाजन, 'बिस्मिल' पुणे, बागलानचे देवदत्त बोरसे, प्रकाशदादा पाटील व मोहनदादा कवळीथकर यांना मी माझे मार्गदर्शक मानतो. मोहनदादाने माझी अहिरानी मायबोलीत लिहिलेली रचना तपासून पाठविल्याशिवाय मी कुठेच पाठवीत नसतो. या सन्मित्रांच्या व्यतिरिक्त ईतरही अनेक सन्मित्र माझे मार्गदर्शक आहेत, मराठीतून लिहीत असताना विशेषत्वाने सिराजदादा सिकलगार , यशवंतराव पगारे, मनोहरदादा आंधळे सर आणि तुमच्यापैकी बरेच रसिक बांधव माझे प्रीय वाचक, रसिक तद्वतच मार्गदर्शकही आहेत. माझ्या कविता व गझला स्वयंप्ररणेने स्वरबद्ध करुन त्या युट्युबवर सादर करुन तळागाळापर्यंत पोचवणारे, भडगाव, जि. जळगाव येथील दयाराम वाघ सर, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अरूणाताई दुद्दलवार व माझी कन्या सौ. रेणुकाताई छगनराव तिरमले यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो!
"गझलमंथन" द्वारा घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मला व माझ्यासारख्या असंख्य नवोदितांना गझलप्रांतात प्रवेश करता आला, त्यामुळे हे अहोभाग्य मला प्राप्त करुन देणाऱ्या "गझलमंथन" संस्थेचे योगदान फार मोठे आहे या संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल कांबळे, माई उर्मिलाताई बांदिवडेकर, मा. जयवंतराव वानखेडे सर, श्री.भरतदादा माळी सर, अॕड. मुकुंदराव जाधव सर, नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी व गझलकार श्री.काशिनाथ महाजन, सौ. मृणालताई गीते, श्री. नंदकिशोरदादा ठोंबरे, श्री संजयदादा गोरडे, आप्पासाहेब वाबळे सर, अशोकराव ईतर मान्यवर कवी व गझलकार तसेच समस्त सन्मित्रांचा मी शतशः आभारी आहे.
विदर्भातील झाडीबीली साहित्य संस्थेचे संस्थापक भीष्मपितामह डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहेब, आचार्य ना.गो.थुटे, मसाप पुणे, शाखा चाळीसगावचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब तानसेनजी जगताप व ईतर सर्वच पदाधिकारी यांचे योगदान शब्दातित आहे.
यात कुटुंबियांचाही सिंहाचा वाटा आहे हे नमूद करणे मला अगत्याचे वाटते!
शालेय जीवनापासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता घेता वाचनाची आवड निर्माण झाली व सोबतच साहित्याभिरुचि देखील सतत वाढत गेली!
आज सत्याहत्तरी ओलांडताना अनेकानेक कटु गोड अनुभवांनी जे मला शिकविलेलं आहे, ते जितकं चांगलं आहे तितकंच भयावह देखील आहे, त्याचा उहापोह करणे तुर्तास तरी टाळणेच मला योग्य वाटते!
चुकणे हा मानवधर्म आहे! त्यामुळे माझ्याकडून जाणता अजाणता जर काही चुका झाल्या असतील, तर कृपया मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी अशी आपणांस विनम्र प्रार्थना करतो व थांबतो!
शिवाजी साळुंके 'किरण'
चाळीसगाव, जि. जळगाव.
हल्ली मुक्काम- नागपूर.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा