शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन

 शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन 



      नंदुरबार (प्रतिनिधी) येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही नववर्ष दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन करण्यात आले.  या दिनदर्शिकेत हिंदू सण उत्सवांची परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

      श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानच्या संत निवास सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी भाग्यनगर हैदराबाद येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे सिदाजी आप्पा देवर्षी मठाचे गादीश्वर आणि  उत्तर अधिकारी चंद्रशेखर आप्पा देवर्षी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर चंद्रशेखर आप्पा देवर्षी यांच्या हस्ते सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सहकार भारतीच्या जिल्हा महिला प्रमुख सुरेखा वळवी यांनी पुष्प अर्पण केले तर शहीद शिरीषकुमार यांच्या प्रतिमेस   समाजसेवक अर्जुन रामदास मराठे यांनी पुष्पहार अर्पण  केले.  दिनदर्शिका प्रकाशन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रदीप महाजन, अशोक टेंभेकर, जितेंद्र मणिलाल सोनार,  पुजारी प्रशांत जानी महाराज,श्री दत्त मंदिराचे पुजारी दीपक त्रिवेदी, गणपती मंदिराचे पुजारी प्रदीप भट महाराज, भागवतकार रवींद्र पाठक गुरुजी, महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील कुवर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बी. डी. गोसावी, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, छाया जैन प्रतिष्ठानचे

     सुरेश जैन,राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत,मधुकर माळी,अरुण महाजन, सहकार भारतीच्या महिला प्रमुख सुरेखा वळवी, सहप्रमुख श्रद्धा पाटील, योगेश्वर जळगावकर, पत्रकार वैभव करवंदकर, ईश्वर फाळके,उपस्थित होते. प्रस्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले तर आभार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी हिरणवाळे, आनंदा गवळी, ईश्वर फाळके, विशाल हिरणवाळे यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni