वासलात (कादंबरी) Latika Chaudhari

 वासलात (कादंबरी) 




     ज्येष्ठ लेखिका खानदेश कन्या लतिका चौधरी यांचे अकरावे पुस्तक वासलात (मराठी कादंबरी) लवकरच आपल्या भेटीला येते आहे. सदरहू कादंबरीस जेष्ठ साहित्यिक एकनाथ पगार यांची पाठराखण लाभली असून मा. प्रा. फुला बागुल यांची प्रस्तावना व प्रा. रमेश माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

_______________________________


मानवी मनातील लोभ, मद, मोह, मत्सर,

कामभावाचे आकर्षण आणि उथळ सुखसंपन्नतेच्या ध्यासात एक सुडकथा

अधिकाअधिक गुंता निर्माण करीत जाते.

प्रेम, क्षणिक सुखभाव वरवर उन्मळत

राहतात. 

विवाहिता, एकल स्त्री, परित्यक्ता, विधवा,

नवथर तरुणी, माता, सखी अशा स्त्री रूपाच्या विविध परी, त्यांचे पुरुषांशी असलेले नैतिक, अनैतिक आणि न-नैतिक संबंधाचे परिणामकारक चित्रण वाचकाच्या मनास, बुद्धीस कोरत जाते, टुचत जाते. वाचक अलगद आपल्या, सभोवतालच्या गतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो. 

स्वयंप्रज्ञ धाडसाने विवेकी, मुक्त आयुष्य

घडवू पाहणारे स्त्रीरूप वेगळे पडत असले

तरी वाचकासमोर, समाजामोर एक आदर्श रूप म्हणून उभे राहते.

स्त्री ही व्यक्तिगत मालमत्ता समजून छळणारे, सूडबुद्धीने शिकार साधणारे आणि लंपट पुरुष, पेशा विसरून विकृत जीवन जगताना दिसतात. आपण भक्ष होत आहोत असे भान नसल्याने वाहवत जाणारे स्त्रीरूपही भकासल्या भावविश्वाचे स्मरण देते.

विलक्षण जीवनानुभव, वाचनीयता आणि

वाताहतीचे हेलकावे देणारा हा आजच्या घडीचा पडझडीचा संसार म्हणजे 'वासलात' .

स्वातंत्र्य आणि स्वैरता तफावत न आकळल्यास  भावविश्व, स्वप्नं, निरपराध आयुष्यांचा बळी जाणं, बळी देणं अनेक

आयुष्यांची वाट लावते हे सामाजिक वास्तव चितारणारी कादंबरी वाचकांना विचार करण्यास भाग पाडते.

खान्देश कन्या लतिका चौधरी यांची ही 'वासलात' कादंबरी  म्हणजे पुस्तक रुपातली दहावी निर्मिती. खान्देशी अहिराणी भाषेतील दोन काव्यसंग्रह व दोन ललीतगद्य, दोन मराठी काव्यसंग्रह, मराठी कथासंग्रह,  मराठी ललित गद्य, आणि मराठी बाल काव्यसंग्रहरूप शब्दश्रीमंती बरोबर 'त्रिकोणातील वादळ पेलताना' ह्या बहुचर्चित मराठी कादंबरी नंतर 'वासलात' ही कादंबरी ज्यात रहस्यमय आणि विस्मयकारक घटितांनी भारावलेले अचंबित करणारे अविश्वसनीय प्रसंग वाचकास खिळवून ठेवतात.           

                 वसाहतीतील वातावरण निर्मिती, निम्न -मध्यमवर्गीय जीवनदृष्टी, स्त्री विषयक भूमिका, प्रभावी लेखनशैली असलेली लेखनसंहिता लतिका चौधरी ह्या सिद्धहस्त लेखिका आहेत हे सिद्ध करते.

शुभेच्छा!

           एकनाथ पगार

            देवळा- 423102



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni