हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni
● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷हाता मधला डाव हारता येतो🌷
शब्द जोडुनी अर्थ बदलता येतो
शब्द खोडुनी अनर्थ करता येतो
भातुकलीचा खेळ खेळला की मग
संसाराचा डाव जिंकता येतो.
पैशामागे धावत सुटल्यावरती
स्वाभिमानही सहजच विकता येतो
समोरचा जिंकावा म्हणून हल्ली
हाता मधला डाव हारता येतो
आयुष्याने हतबल केल्या नंतर
झालेला अपमान हि गिळता येतो
रेखा कुलकर्णी
गझलकारा रेखाजी कुलकर्णी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

छान जमली आहे गझल ....
उत्तर द्याहटवाआवडली ....
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ....
🌹🎂💐