नवी मुंबईत १९ जानेवारी रोजी रंगणार दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन

 नवी मुंबईत १९ जानेवारी रोजी रंगणार 

दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन




     नंदुरबार, दि. २२  गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी  ९ ते ६ यावळेत विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर -१६ A, वाशी बस डेपो समोर, जुहू - वाशी रोड, वाशी, नवी मुंबई येथे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

 

     या संमेलनात संपूर्ण भारतातील गझलकारा सहभागी होऊ शकतात. आजीवन सभासदांना प्रथम प्राधान्य असणार आहे. नावनोंदणी व सहभाग निःशुल्क असेल. नावनोंदणीची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५ अशी आहे. नाव नोंदणीसाठी मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. प्रणाली म्हात्रे (मो. 8779879446) आणि मुंबई जिल्हा सचिव सौ. सोनाली जगताप (मो.  88502 39310) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव व मुंबई जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni