बालगायिका स्पृहाच्या गोड आवाजात हनुमान चालीसा

बालगायिका स्पृहा सागर पाटीलच्या आवाजात हनुमान चालीसा; नऊ दिवसांत ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज


     ज्येष्ठ गझलकार प्रा. सुनंदा पाटील (गझलनंदा) यांची नात स्पृहा सागर पाटील (वय ११) हिने आपल्या गोड आवाजात सादर केलेल्या श्री हनुमान चालीसाच्या व्यावसायिक रेकॉर्डिंगला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टाइम्स म्युझिक व्हिडिओने हे रेकॉर्डिंग केले असून, अवघ्या नऊ दिवसांत या व्हिडिओला ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


स्पृहाच्या गायनातील मधुर आवाज, ताल-सुरांची उत्तम समज, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे श्री हनुमान चालीसाचे गायन अत्यंत श्रवणीय झाले आहे. तिच्या या सादरीकरणाचे संगीतप्रेमी आणि रसिकांकडून कौतुक होत आहे.


स्पृहा सध्या इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ. सुहासिनी नांदगावकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. सौ. सुहासिनी नांदगावकर या सुप्रसिद्ध गीतकार व कवीवर्य शांताराम नांदगावकर यांच्या सुनबाई आहेत. स्पृहाने आतापर्यंत शास्त्रीय कंठसंगीताच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.


गायन क्षेत्रात स्पृहाने अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले असून, Rhythm of Life, स्वरांजली, गझलांकित यांसह विविध संगीत मंचांवरून ती आपल्या गायनकलेचे सादरीकरण करत असते. गायनाबरोबरच तिला चित्रकलेचीही विशेष आवड आहे.


वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी व्यावसायिक रेकॉर्डिंगची संधी मिळवून आपल्या गायनातून हजारो रसिकांची मने जिंकणाऱ्या स्पृहा सागर पाटील हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या या यशामुळे संगीत क्षेत्रात तिच्या पुढील वाटचालीबद्दल आशा आणि उत्सुकता व्यक्त केली जात आहे. तिच्या संगीतप्रवासाला अधिकाधिक यश लाभो, अशा शुभेच्छा रसिकांकडून दिल्या जात आहेत.



 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा 

https://youtu.be/ER5K2YQ8QCw?si=d4rY7HdsP-xzMuEW


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डोळ्यांत साठवावे बेभान वादळाला Gazalkar Anil Kambale

हाता मधला डाव हारता येतो Gazalkara Rekha Kulkarni